2009 पासून कर्जमाफी देण्याचा सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय

2009 पासून कर्जमाफी देण्याचा सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अस्मानीसह आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची कर्जाच्या बोज्यातून सुटका करण्याकरता सरकारने आणखी एक पाऊल उचललं.

 

 

आता थेट 2012 ऐवजी 2009 पासून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्य सरकारने केवळ 2012 पासून 2016 पर्यंतच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती.

 

 

मात्र सरकारच्या या नव्या भूमिकेमुळे निश्चितच राज्यातील बळीराजाची आर्थिक विवंचनेतून मात्र सुटका होईल, असं नवं आशादायी चित्र निर्माण झालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version