जय महाराष्ट्र न्यूज, परभणी
आतापर्यंत मुलांच्या लग्नाच्या चिंतेत कर्जबाजारी शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या आहेत. मात्र, आता आपल्या पित्याला लग्नाची चिंता नको म्हणून कर्जबाजारी शेतकऱ्याच्या
मुलीनंच आत्महत्या केली.
परभणीच्या पाथरीतील सारिका झुटेनं स्वत:लाच संपवले. सारिकाचे वडील सुरेश झुटे यांनी दुबार पेरणी केली होती. मात्र, पावसाअभावी हे पीकही करपून गेले.
आधीच आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज आणि आता दबार पेरणीचं पीकही हातातून गेल्याने आपले वडील चिंताग्रस्त झाले आहेत.
इतर शेतकऱ्यांप्रमाणे तेही आत्महत्या करतील, असी भीती सारिकाला होती. त्यामुळे कर्जाचं ओझं असलेल्या आपल्या वडिलांवर आपण गेल्याने आपल्या लग्नाचा भार
तरी कमी होईल असा विचार सारिकानं केला आणि तिनं स्वत:ची जीवनयात्रा संपवली.
सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं कायम आहे, त्यामुळे आपल्या शेतकरी वडिलांना जगवण्यासाठी मुलीनं स्वत:चा जीव दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.