मंत्रालयात विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचे निधन

मंत्रालयात विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री उशिरा निधन झाले.

त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते.  ‘लेखी आश्वासनाशिवाय धर्मा पाटलांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही’  अशी भूमिका धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनं घेतलीय.

मृत्यूपश्चात पाटील यांचे नेत्रदान करण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानासाठीही अर्ज केला असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version