कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यातील कवडगाव येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोपाल दीक्षित अस आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच नाव असून विषारी औषध प्राशन करून या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली. गोपाल दीक्षित शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून काही वित्तीय संस्थांचे आणि खाजगी लोकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र शेतात पिकलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने त्याचबरोबर अवकाळी पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता.

या आर्थिक विवंचनेत या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवली असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातंय. सरकारतर्फे शेतकरी मदतीसाठी अनेक घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने पुन्हा एकदा दिसून आले आहे.

https://youtu.be/igMD7E3ywo4

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version