जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाणामध्ये कर्ज वसुलीच्या भितीने शेतकऱ्यांनी तोंड काळ करो आंदोलन केले.
या आंदोलनात शेतकऱ्यांसह स्वाभीमानीचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांनी आपलं तोंड काळ करुन रेणुका माता मंदिरात आश्रय घेतला. बुलडाणासह संपूर्ण राज्यातील शेतकऱी कर्जबाजारी झाला.
मात्र, सरकार आश्वासनं देउनही कर्जमाफी देत नाही. शेतकऱ्यांकडे घेतलेलं कर्ज फेडण्याचेही पैसे नाहीत.
जर, उत्तर प्रदेशात कर्ज माफी होउ शकते तर, महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळेच कर्ज माफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या
शिफारसी लागू करण्याची मागणी आज आंदोलनाद्वारे करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.