#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली ‘ही’ बॉलिवूड दिग्दर्शिका!

#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली ‘ही’ बॉलिवूड दिग्दर्शिका!

दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहिण फराह खान हिनं प्रतिक्रिया दिली आहे. “मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे”, असं फराह खाननं म्हटलं आहे.

फराह स्वत:एक दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या फराह खाननं आता साजिदच्या कृष्णकृत्याची ट्विटरवर निंदा केलीआहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यांनी साजिद खानचं विकृत वर्तन आणि महिलांप्रती असलेलं त्याचं असभ्य वर्तन जगासमोर आणलं होतं. त्यानंतर फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे.

 

“जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झालंआहे. माझं कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावानं अशाप्रकारे असभ्य वर्तन केलं असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचं मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येकमहिलेच्या पाठीशी उभी आहे’ असं फराहनं ट्विट करत म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version