धनुषचा अवतार पाहून चाहते थक्क

धनुषचा अवतार पाहून चाहते थक्क

मुंबई , २९ मे २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता धनुष याची बेक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. धनुषच्या अभिनयासह त्याच्या स्टाईलचे देखील बरेच चाहते आहेत. अलीकडे तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत असतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोमवारी (२९ मे रोजी) धनुषचा विमानतळावरील एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धनुष चा अवतार पाहून त्याला ओळखणे कठीण झाले आहे. त्यामुळेच हा व्हिडिओअल्पावधीतच समाज माध्यमांवर धुमाकूळ घालू लागला आहे.


व्हायरल झालेल्या व्हिडिओत धनुषने गुलाबी रंगाचा स्वेट शर्ट आणि ट्रॅक पॅंट परिधान केली आहे. तर विशेष म्हणजे यात सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे धनुषच्या छातीपर्यंत वाढलेल्या दाढीने आणि खांद्यापर्यंत वाढलेल्या केसांनी. त्याचा हा लुक पाहून नेटकरी भारावून गेलेत. काही दिवसांपूर्वी धनुषने आपल्या या लूकची झलक समाज माध्यमांवर सामायिक केली होती. त्यांनतर आता त्याला प्रत्यक्ष असे पाहता आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version