Yavatmal Flood : अंदाज चुकला अन् हसतं खेळतं कुटुंब पुराच्या पाण्यात वाहून गेलं! आईसह दोन चिमुकल्या मुली बेपत्ता

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी येथील अविनाश नामदेव खंडारे यांच्या एर्टिगा कारला दहिलीजवळील अडाण नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्याचा फटका बसून कार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Yavatmal Flood : अंदाज चुकला अन् हसतं खेळतं कुटुंब पुराच्या पाण्यात वाहून गेलं! आईसह दोन चिमुकल्या मुली बेपत्ता

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी येथील अविनाश नामदेव खंडारे यांच्या एर्टिगा कारला दहिलीजवळील अडाण नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्याचा फटका बसून कार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कारमध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि दोन मुली प्रवास करत होत्या. अविनाश खंडारे हे झाडावर अडकलेल्या अवस्थेत असतांना त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मात्र, त्यांची पत्नी व दोन्ही मुलींचा अद्याप शोध लागलेला नसून शोध व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, पुराच्या प्रवाहात पुढील कोणत्याही गावाजवळ संबंधित एर्टिगा कार दिसल्यास किंवा या घटनेसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ खात्रीशीर माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवावी, तसेच पुरग्रस्त भागात अनावश्यक गर्दी टाळून बचावकार्याला सहकार्य करावे.

हेही वाचा- Thane Bhiwandi Building Collapse: भिवंडीत मोठी दुर्घटना!चार मजली इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुसळधार पावसामुळे बाभुळगाव-कळंब मार्ग वाहतुकीसाठी बंद
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाभुळगाव-कळंब मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आणि पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात पावसाचा जोर कायम असून नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. 

बाभुळगाव-कळंब रस्त्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवत पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत हा मार्ग बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version