जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
अपहरण व हत्येच्या सत्राने उपराजधानी थरारली आहे. त्यामुळे नागपूकरांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले आहे. गुरुवारी सायंकाळी सोनेगावात झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच रात्री 10 च्या सुमारास खुनाची आणखी एक घटना उघडकीस आली. दोन मेहुण्यांनी जावई अविनाश मेहरा यांची काठीने वार करून हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
राहुल आग्रेकर अपहरण व हत्याकांडच्या घटनेने आधीच हादरलेल्या उपराजधानीत 12 तासांच्या आत दुसरी हत्या झालीये. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी प्रवीणला अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.