अर्थसंकल्पावर विधानसभेत फडणवीसांचं भाष्य, म्हणाले…   

अर्थसंकल्पावर विधानसभेत फडणवीसांचं भाष्य, म्हणाले…   

राज्याचे अर्थसंकल्प आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मागील वर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल असे म्हटले तेव्हा खिल्ली उडवली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. तसेच आर्थिक वर्ष संपले तरी अनेक विभागांनी ५० टक्के निधी वापरला नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांसाठी सर्वात जास्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काढला. राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना सर्वाधिक निधी दिला आहे तर शिवसेना आणि काँग्रेसची बोळवण केली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी भांडाफोड केली आहे. तसेच ज्याची ताकद आहे त्याला मदत आहे, ज्याची ताकद कमी तो उपाशी आहे, अशी अर्शसंकल्पाची स्थिती असल्याचेही फडणवीस म्हणाले.

राज्याच्या २०२२ अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला ३ लाख १४ हजार ८२० कोटी रुपये इतका निधी देण्यात आला. तर काँग्रेसला १ लाख ४४ हजार १९३ कोटी रुपये आणि शिवसेनेला ९० हजार १८१ कोटींचा सर्वात कमी निधी देण्यात आला आहे. सरकारमध्ये ज्याची ताकद जास्त त्याला जास्त मदत अर्थसंक्लपात देण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version