‘मी पुन्हा येईन’

‘मी पुन्हा येईन’

राज्यातील सत्तासंघर्ष प्रचंड पेटला असताना सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित असलेली सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. आणि त्याचबरोबर सध्या राजकीय घडामोडींनी देखील वेग धरला असून आता देवेंद्र फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणाबाजी करत कोल्हापुरात टोलेबाजी केली आहे.

राजकीय वातावरण तापलेले असताना देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याने एक वेगळा राजकीय खेळ सुरू होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस गुरुवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये त्यांची एक छोटेखानी सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव पाटील यांना उद्देशून,“पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असे म्हटले.

महाराष्ट्रातील सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात चांगलाच रंगलेले असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार का? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version