Fadnavis meets Raj Thackeray : राज ठाकरेंची भेट का घेतली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज यांच्या भेटी मागचे कारण स्पष्ट केले आहे. यात त्यांनी ही भेट राजकीय नव्हती, असं म्हटलं आहे.
Fadnavis meets Raj Thackeray : राज ठाकरेंची भेट का घेतली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट फडणवीस यांनी ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज-फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज यांच्या भेटी मागचे कारण स्पष्ट केले आहे. यात त्यांनी ही भेट राजकीय नव्हती, असं म्हटलं आहे.

 

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज यांच्यासोबतची आजची ही भेट राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला. तेव्हा मी त्यांना घरी येईन, असे सांगितले होते. सांगितल्यानुसार आज मी राज यांच्या घरी आलो होते. राज यांच्यासोबत ब्रेकफास्ट केला, गप्पा मारल्या. या भेटीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी राज यांच्या घरी गेलो होते.”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीचा बंपर विजय झाला. या विजयानंतर राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर राजकीय वर्तूळात चर्चांना ऊत आला होता. यादरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे पुन्हा आता राजकीय वर्तूळात चर्चांना ऊत आला आहे.

 

फडणवीस-राज भेटीवर संदीप देशपांडे काय म्हणाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी फडणवीस यांची भेट ही सदिच्छा भेट होती, असे म्हटले आहे. पत्रकारांनी यावेळी देशपांडे यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबद्दल काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितल की, आजची भेट राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात पण राजकारण्यांचे वैयक्तिक संबंध असतात, असे संदीप देशपांडे म्हणाले.  

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version