कंबोज यांच्या वाहनावरील हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध

कंबोज यांच्या वाहनावरील हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. शिवसैनिकांनी बळजबरीने गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कंबोज यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही.

तसेच, आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे.

शुक्रवारी भाजप नेते मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच, मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान, मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे सर्व आरोप खोडून काढले. तर हल्ल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर, जयंत पाटील कंबोज यांची भेट घेतली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version