लातूर जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौरा रद्द केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना किरकोळ ताप आल्यामुळे सोलापूर दौरा रद्द करून फडणवीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे ४ जूनपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमान्यू पवार यांनी केलेली विकास कामे पाहण्यासाठी फडणवीस लातूरात आले होते. अभिमान्यू पवार यांची विकास कामे पाहिल्यानंतर फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, फडणवीस यांनी किरकोळ ताप आल्यामुळे त्यांनी सोलापूर दौरा रद्द करून मुंबईत रवाना झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस सोलापुरात एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागरिकांशी संवाद साधणार होते. मात्र, सोलापूर दौरा फडणवीसांनी रद्द करत मुंबईकडे रवाना झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.