“इथे कोणीही औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करू शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे . पण हे नव्याने जे पैदा झालेले आहेत त्यांचे बोलविते धनी कोण आहेत ? हे आमही शोधून काढू !”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली. “महाराष्ट्रात कोणीही औरंगजेबाचे उद्दात्तीकरण केलं तर संताप होतोच पण त्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. “कायदा आणि सुव्यवस्था खराब होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी”, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीसांनी शांततेचं आव्हान केलं आहे.
कोल्हापुरात मंगळवारी (६ जून) शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यावरुन दगडफेकीचा झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारीच (६ जून) जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. त्यानंतर बुधवारी (७ जून) हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंडाची हाक देण्यात आली. तसेच, ठिय्या आंदोलनही करण्यात आले. हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र, आंदोलक भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.