फेसबुक पुन्हा हॅक! कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरीला!

फेसबुक पुन्हा हॅक! कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरीला!

2017 ते 2018 या दरम्यान फेसबुकचा डेटा मोठ्य़ा प्रमाणात चोरीला गेलाय. महिन्याभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून जवळपास 5 कोटी युसजर्सचा डेटा चोरीला गेल्याचं स्पष्ट झालंय. आतापर्यंत 3 कोटी युसर्सचा डेटा चोरीला गेल्याचं फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय.

चार  लाख अकाउंट हॅक करुन, त्यांच्या अकाउंटच्या  माध्यमातून हा डेटा चोरी करण्यात आली. हॅकर्सनी जवळपास 3 कोटी यूसर्सची नावं, फोन नंबर, ई-मेल्सची माहिती मिळवली, तर जवळपास 1.4 कोटी यूसर्जच्या  रिलेशनशीप स्टेटस आणि इतर गोपनीय माहितीसुध्दा चोरली आहे. यासाठी हॅकर्सनी View as या सेटिंगचा गैरवापर केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

डेटा चोरीनंतर फेसबुकने सरंक्षक उपाययोजना केल्या. यामध्ये 3 कोटी यूसर्जना कस्टमराईज मॅसेजेस पाठवण्यात आले, आपला डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासंदर्भातील सूचनाही स्पष्ट देण्यात आल्या आहेत. सुदैवाने या सायबर अटॅकमधून इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हाट्स अॅप, वर्कप्लेस सुरक्षित राहीले आहेत. या प्रकरणी एफबीआयपासून तर सर्व यंत्रणा चौकशी करत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version