अकोल्यातील फटाका कारखान्यात स्फोट

अकोल्यातील फटाका कारखान्यात स्फोट

वाडेगाव पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तांदळी बेलुरा मार्गावर फटाका कारखान्यात स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर, पाच ते सहा जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. कारखाना भांडारज शेतशिवरात असून घटना मंगळवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

फटाक्यांसाठी बांधलेल्या खोल्यामध्ये स्फोट झाल्याने येथे उपस्थित असलेल्या मजुरामध्ये रजाकभाई यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. तसेच यामध्ये काही मजूर गंभीर जखमी झाले. यात धम्मपाल सीताराम खंडेराव, मंगेश भीमराव खंडेराव, रिना मंगेश खंडेराव, दादाराव नवघरे, सुरेश नामदेव दामोदर यांचा समावेश आहे. हे सर्व तांदळी येथील रहिवासी आहेत. सर्वजण फटाका कारखान्यात काम करीत होते.

फटकाच्या स्फोटामुळे खोल्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच चारचाकी मालवाहन सुद्धा जळून खाक झाले आहे. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version