विधानसभा निवडणुकांचे ‘एक्झिट पोल’

विधानसभा निवडणुकांचे ‘एक्झिट पोल’

कर्नाटक विधानसभा बुधवारी (१० मे) रोजी पार पडली. हे मतदान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु होते. तर, या निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकमध्ये आज मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजप ११४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवू शकते. तर, काँग्रेसला ८६ आणि जेडीएसला २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.

झी न्यूज मॅट्रिज एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप ७९-९४ जागा जिंकू शकतो, तर काँग्रेस १०३-११८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो किंवा बहुमत मिळवू शकतो. जेडीएसला २५-३३ जागा मिळू शकतात आणि इतर आणि अपक्ष २-५ जागा जिंकू शकतात.

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार, भाजपला 88-98 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ९९-१०९ जागा मिळू शकतात. बहुमतापेक्षा हा आकडा कमी आहे. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला २१-२६ जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतरांना ०-४ जागा मिळू शकतात.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. येथे भाजपला ८५-१०० जागा मिळतील, तर काँग्रेसला ९४-१०८ जागा मिळतील. जेडीएसला २४-३२ जागा मिळू शकतात आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात.

सुवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार, भाजपला ९४-११७ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ९१-१०६ जागा मिळू शकतात. जेडीएसला १४-२४ जागा मिळतील आणि इतरांना ०-२ जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ७८-९२ जागा, काँग्रेसला १०६-१२० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जेडीएसला २०-२६ आणि इतर पक्षांना २-४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version