कर्नाटकात मतदानावेळी ईव्हीएमचा चक्काचूर

कर्नाटकात मतदानावेळी ईव्हीएमचा चक्काचूर

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बसवनवागेवाडीत घडलेल्या घटनेमुळे लोकशाहीला काळीमा फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी मतदारसंघात मतदान चालू होते. त्यावेळी गैरसमज निर्माण होऊन ईव्हीएम मशीनचाच चक्काचूर करण्यात आला आहे.

मतदान केंद्रात एखाद्या वेळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यास मतदान स्थगित होऊ नये म्हणून जादाची ईव्हीएम मशीन परत घेऊन जात असताना मतदान केंद्राबाहेर उभे असलेल्या नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी मतदारसंघातील मिसिबनाळ गावात गैरसमजुतीमुळे चार ते पाच ईव्हीएम मशीन (मतदान यंत्र) फोडून चक्काचूर करण्यात आल्याची घटना घडली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version