धरण उशाला अन् कोरड घशाला

धरण उशाला अन् कोरड घशाला

एकीकडे बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील कासारसाई धरणातील पाण्यानं तळ गाठला आहे. त्यामुळे गावांवर पाणी टंचाईचं संकट ओढावणार असल्याची दात शक्यता दिसून येत आहे.

पुण्यातील कासारसाई धरणात आता एकूण ३६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पण या एका धरणामुळे आठ गावांवर पाणी टंचाईचं संकट ओढावणार की काय असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी येथील नागरिकांची स्वास्थ जळी आहे. मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. धरणात आता फक्त ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने जूनच्या अखेरीस पुरेल इतकंच पाणी या धरणात बाकी आहे. मावळ तालुक्यातील काही गावे आणि मुळशीतील काही गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. वेळेत पाऊस पडला नाही तर या आठ गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्ववभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन शेतकरी आणि नागरिकांना केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version