ऐतिहासिक वारसा जपणारा इरॉस

ऐतिहासिक वारसा जपणारा इरॉस

मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : चर्चगेटच्या उच्चभ्रू वस्तीत वसलेले इरॉस चित्रपटगृह हे मुंबईतल्या आलिशान चित्रपटगृहांपैकी एक आहे. पण आता दुर्दैवाने या चित्रपटगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. अशातच या चित्रपटगृहाचे काही फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे.

अनेक बड्या सिनेमांचे प्रीमियर सोहळे पाहणाऱ्या अनुभवणाऱ्या इरॉस चित्रपटगृहाची आज दयनीय अवष्ठ झाली आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे सगळीकडे मल्टिप्लेक्सचे वादळ आले आणि त्यापुढे अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना हार पत्करावी लागली. पण या काळात देखील इरॉसने लढा देत संघर्ष केला .
परंतू अखेर २०१७ मध्ये त्याला हात पत्करावी लागली. आता या चित्रपटगृहाचे रूपांतर मॉल मध्ये होणार आहे.
अपूर्व नावाच्या एका नेटकऱ्याने इरॉस चित्रपटगृहाचे काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोसोबत त्याने,” हार्टब्रेकिंग..इरॉस थिएटर आता कालबाह्य झाले. दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत असलेले हे थिएटर १९३८ साली उभारण्यात आले होते. मला आठवतंय मी कॉलेज बुडवून इरॉसमध्ये सिनेमे पाहिले आहेत. हे तेच चित्रपटगृह आहे जो माझ्या पहिल्या रोमँटिक डेटचा साक्षीदार आहे. मला वाईट वाटतंय मुंबईला आपला वारसा जपता आला नाही याचं”.

अपूर्वच्या या ट्विटवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,”अनेक सिंगल स्क्रीन असलेली चित्रपटगृहे बंद पडली.सोबत माझ्या बालपणीच्या आठवणींचा देखील त्यात अंत झाला. मी दिग्दर्शित केलेले ४ सिनेमे इथे रिलीज झालेत. तर शेकडो सिनेमे इथे मी पाहिले आहेत. तो एक अद्भूत काळ होता..पण आता वास्तवात ते सगळं हरवलं आहे याची जाणीव त्रासदायक आहे”.
या पोस्ट वर अनेक सिनेप्रेमींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version