इंग्लंड झालंय भारतीय फरारी आरोपींचं आश्रयस्थान

इंग्लंड झालंय भारतीय फरारी आरोपींचं आश्रयस्थान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंग्लंड भारतातल्या फरारी आरोपीचं आश्रयस्थान झाल्याचं दिसून येत आहे. भारतातून इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या 13 आरोपींच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केलीय.यासंदर्भात नवी दिल्लीत गृह राज्यमंत्री किरण रिजीजू आणि ब्रिटीश मिनिस्टर ब्रँडन ल्यूईस यांच्यात बैठक झाली.त्यावेळी भारताने विजय माल्या, ललित मोदी यांच्यासह इतर 11 जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी इंग्लंडकडे केली.

9 हजार कोटींचं कर्ज घेऊन भारतातून फरार झालेला विजय माल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे.त्याचबरोबर घोटाळ्याचा आरोप असलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदीही लंडनमध्ये आहेत.दरम्यान माल्याच्या जामिन अर्जावर 4डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version