इलेक्ट्रिक दुचाकी आग प्रकरण

इलेक्ट्रिक दुचाकी आग प्रकरण

इलेक्ट्रिक दुचाकी घेताना गाडीच्या बॅटरीची क्षमता किती आहे. गाडीची वेगमर्यादा किती आणि त्या गाडीची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करावी लागेल. या संदर्भात सर्व माहिती घेतल्या नंतरच गाडी घेण्याचा अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा तुमच्यावर सुद्धा डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येईल. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत ५० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्याची वेळ मर्यादा २५ किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक आढळून आली आहे.

साधारणपणे गेल्या दोन ते तीन वर्षात ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला आहे. मात्र, मोटार वाहन कायद्याची फारसी माहिती ग्राहकांकडे उपलब्ध नसल्याने नेमका याच अज्ञानतेचा गैरफायदा घेऊन इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक सुरू केली आहे. नियमानुसार प्रतितास २५ किलोमीटर अंतर धावेल अशा गाड्यांना आरटीओच्या नोंदणीची गरज नाही.

मात्र, वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांना कोणतीही सूचना किंवा माहिती न देता प्रति तास ३० ते ५० किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्यांची विक्री केली आहे. बॅटरीच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने गाड्या पळत असल्याने आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात शेकडो गाड्या नियमांच उल्लंघन करून धावत असल्याचे पुढे आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version