वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भूमिकेपाठोपाठ निती आयोगानेही त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
2024 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस आयोगाने केली.
निती आयोगाने तीन वर्षांसाठीच्या अहवालाचा मसुदा तयार केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शिफारशीबाबत विचार करावा आणि त्यासंदर्भात रूपरेषा
तयार करण्यासाठी संबंधितांचा कार्यगट नेमावा, अशी सूचना निती आयोगाने निवडणूक आयोगाला केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.