विरोधकांची VVPAT संदर्भात मागणी ECने फेटाळली

विरोधकांची VVPAT संदर्भात मागणी ECने फेटाळली
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट राजकीय पक्षांसह नागरिकही पाहत असताना 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी, अशी मागणी केली होती. यामुळे निवडणूक आयोगाने यासंदर्भात बैठक घेतली. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे विरोधकांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

EVM मध्ये छेडछाड होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे.

यामुळे 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे.

मतमोजणी करण्यापूर्वी मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी व्हावी.

तसेच पडताळणी करताना काही अढळल्यास व्हीव्हीपॅटची संपूर्ण पडताळणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

EVM ची छेडछाड झाल्याची तक्रार आल्या असून निवडणूक आयोगाने त्वरीत यावर पाऊल उचलावे अशीही कॉंग्रेस पक्षाने मागणी केली.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने बैठक घेतली.

मात्र बैठकीमध्ये निवडणूक आयोगाने मागणी फेटाळली आहे.

निवडणूक आयोगाने मागणी फेटाळल्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याता प्रयत्न केला.

आपण सत्यासाठी लढत आहोत म्हणून घाबरून जाऊ नका.

फेक एक्झिट पोलवर विश्वास ठेऊ नका.

पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत, असे ट्विटकरून राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना आवाहन दिले हे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version