‘निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकासकामांसाठी १०० कोटी देतो’ – अजित पवार

‘निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या, विकासकामांसाठी १०० कोटी देतो’ – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह लसीकरणाच्या मुद्द्यावरून नागरिकांना सुनावले  आहे. तसेच आजपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिलीय त्याच पद्धतीने येत्या निवडणुकीत देखील साथ द्या, विकासकामांसाठी १०० कोटी रुपये देतो, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले आहे.

‘विविध विकासकामांसाठी जवळपास १०० कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे मागच्या वेळीप्रमाणे यावेळी सुद्धा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून द्या. त्यासाठी मी १०० कोटी रुपये विकासकामासाठी देईल’, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरण संदर्भात आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर देण्याचे आवाहन अजित पवारांनी दिले आहे. शिवाय १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लातूर शहरात नवीन रुग्णालय उभे करण्यासाठी लागणाऱ्या जागेबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवा, शासन त्याला मान्यता देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर दौऱ्यादरम्यान दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version