वृद्धांना नाकावाटे मिळणार लस

वृद्धांना नाकावाटे मिळणार लस

मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : देशात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लगला आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांना इन्कोव्हॅक ही नाकाद्वारे दिली जाणारी लास , मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 इन्कोव्हॅक लसीबद्दल जाणून घेऊया :

इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोरोना लस आहे . हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन इन सेंट लुई यांच्या साथीने ही लस विकसित केली आहे. तर भारतातील ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ६ डिसेंबर २०२२ पासून हि लस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी आपत्कालीन उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली होती.

इन्कोव्हॅक लसीचा नेमका फायदा काय ?

नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या या लसीमुळे आपल्या शरीरात इम्युनोग्लोबुलिन, म्यूकोसल इम्युनोग्लोब्युलिन ए आणि टी पेशी अशा रोग प्रतिकारक यंत्रणा सक्षम होण्यास मदत होते. त्याचबरोबर या लसीमुळे श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्ग आणि विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होते.यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच या लसीचे मोफत डोस दिले जाणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version