किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी एका ६० वर्षीय इसमाचा गळा चिरून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातुन चुंचाळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. किनगाव ता.यावल येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी भीमराव सोनवणे वय ६० हा इसम व्यवसायाने ट्रक चालक होता आणि रात्री घरी परत आला नाही. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली त्याचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली.
मजुरांनी गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, असलम खान, भुषण चव्हाण हे पथकासह दाखल झाले त्याचे प्रमाणे जळगाव येथून डॉग स्कॉट, ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक टिमला बोलवण्यात आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा आणि घटनास्थळाच बारकाईने निरीक्षण केलं जात आहे. मयत याच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. हत्या का व कोणी केली हे अजून स्पष्ट झाले नाहीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.