जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे एकवीरा देवीचं मंदिर. रेणुकामातेचं रुप मानल्या जाणाऱ्या एकवीरा देवीचं जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.
पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या लोणावळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचं मंदिर आहे.
मुंबई-पुणे शहरांच्या मध्यभागी हे मंदिर वसलेले आहे.
प्राचीन लेण्यांमध्ये एकवीरेचे मंदिर अग्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. देवीची मुर्ती स्वयंभू असुन तांदळा दगडात प्रकटलेली आहे, अशी समजुत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.