जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
29 ऑगस्टला मुंबई आणि ठाण्यामध्ये झालेल्या पावासचा फटका हजारो नागरिकांना बसला आहे.
त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील कुंटुबियांना नुकसान भरपाई मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
ठाण्यातील किमान 6 जण अतिवृष्टीत वाहून गेलेत. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत आणून दिले आहेत.
अतिवृष्टीत बाधित झालेल्या मुंबई तसंच ठाणेकरांना नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यानी तातडीने मदत जाहीर केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.