‘एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत’

‘एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत’

गेले अनेक दिवस सत्तासंघर्षाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. त्यातच एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सत्तासंघर्षच गदारोळ माजलेला असताना सर्वांचं त्याच्या निकालाची प्रतिक्ष लागली होती. तर, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणले देवेंद्र फडणवीस?
राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version