ऐरोली, मुलुंडच्या 3 टोलनाक्यांवर टोलमाफी!

ऐरोली, मुलुंडच्या 3 टोलनाक्यांवर टोलमाफी!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

21 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर काळांत ऐरोलीमधील 1 आणि मुलुंडमधील 2 टोल नाके अशा एकूण 3 टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा बायपासमुळे ठाणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्येचा सामना करावा लागत आहे.

 

हा प्रश्न विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाने मुलुंड आणि ऐरली टोलनाक्यांवर पुढील एक महिना टोल न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा टोलवसूली सुरू होणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोल नाके बंद करा अन्यथा कायदा हातात घेतला जाईल अशा इशारा दिला आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसंच मुंब्रा बायपास रस्ता लवकरात लवकर चालू करावा अशी मागणीही त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version