एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेना आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला मारला होता.या बैठकी मध्ये उद्धव ठाकरे बोलताना असे म्हणाले कि काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता.असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या टोमण्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.कारण हे सर्वसामान्यांचं सरकार, असे म्हणत मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.यावर विनायक राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायचे. स्वत:च्या हाताने ट्वीट करता येते का? याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आहे. आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. मी सांगितले नसते तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असं विनायक राऊत म्हणाले.
दरम्यान, सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शिंदेंच्या भाषणाला रिक्षावाल्याची बडबड अशी उद्धव यांच्याकडून संभावना करण्यात आली.अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचला. पुढच्या काळात काय काय खेचतील, कळणार पण असा तिरकस बाणही त्यांनी फडणवीसांवर सोडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.