पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदार निधीतून बांधलेली ओपन जिम एका रात्रीत गायब

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदार निधीतून बांधलेली ओपन जिम एका रात्रीत गायब

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाण्यात कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात

आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झाली.

 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आले होते. मात्र, आमदार निधी खर्च झाल्यावर ओपन जिम बंद करून येथील रस्ता आम्ही तयारच

केला नसल्याचा दावा पालिकेने केला.

 

पण, याच ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या नावाखाली तब्बल 55 लाखांचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version