एकनाथ शिंदे सुरतमध्ये….

एकनाथ शिंदे सुरतमध्ये….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदे गुजरात राज्यात सूरतमध्ये गेल्याची माहिती उघड झाली असून ते सूरतमध्ये नेमकं काय करतायत. असा प्रश्न सर्वाना पडला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांनी असे ट्विट केले की, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”
भाजपाचा सुरत हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सूरतमधील मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे.  याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन संजय कुटे हे हॉटल मेरिडियनमध्ये गेल्याची चर्चा आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि मंगलप्रभात लोढा हे संपूर्ण ऑपरेशन हाताळत असल्याची माहिती आहे. त्यांनी सूरतमधील एक फार्म हाऊसदेखील बूक केलेले आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना त्या फार्म हाऊसवर हलवण्यात येऊ शकतं. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मंगळवारी ‘वर्षा’ वर तातडीची मुख्यमंत्र्यांसोबत आमदारांची बैठक झाली.

Edited By: Krushnai Sawant

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version