आरोपांमुळे खचून जाणारा नेता नाही – एकनाथ खडसे

आरोपांमुळे खचून जाणारा नेता नाही – एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश व्हावा यासाठी जळगावात रुद्राभिषेक करण्यात आला. जळगावच्या गुढे गावच्या महादेव मंदिरात राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी खास ख़डसेंसाठी महादेवाला साकडं घातलं.

यावेळी आरोपांमुळे मी खचून जाणारा नेता नाही, तर समाजाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं खडसेंनी म्हटलंय. तर आजच्या राजकारणाच्या स्थितीवर बोलतांना त्यांनी ‘राजकारणी दिवसा भांडतात आणि रात्री एक होतात’ असं म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version