पश्चिम बंगालमध्ये आठ जणांना जाळले

पश्चिम बंगालमध्ये आठ जणांना जाळले

बंगालमधील बीरभूममधील रामपुरहाट येथील बागुटी गावचे उपप्रधान भादू शेख यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेध म्हणून जमावाने आठ जणांना जिवंत जाळले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीरभूम जिल्ह्यातील बारशाला ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतर ही जाळपोळची घटना घडली असून आठ जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हा बोगतुई गावचा रहिवासी होता. तसेच जाळण्यात आलेल्या एकाच घरातून सात मृतदेह बाहरे काढण्यात आले. तसेच तीन जखमींपैकी एकाचा मंगळवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.’

या दुर्घटनेबाबत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी ट्विट करत बीरभूम जिल्ह्यातील हिंसाचाराचा तीव्र निषेध करत दुःख व्यक्त केले. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version