दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे निर्माण होणारा गुणांचा फुगवटा अखेर फुटणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याऐवजी, त्यांच्या कौशल्यानुसार टक्केवारीच्या पार्श्वभूमीवर गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शुक्रवारी जीआरच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. मात्र, या निर्णयाच्या मदतीने मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले होते. निकालाचा टक्का वाढविण्यासाठी या निर्णयाचा उपयोग करून घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाने अतिरिक्त गुणांच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version