जयंत पाटलांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

जयंत पाटलांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवले आहे. जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा ईडीने समन्स बजावले असून येत्या २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने जयंत पाटलांना दिले आहेत.

आयएल एँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना चौकशी हजर राहण्यासाठी ईडीने यापूर्वी नोटीस बजावली होती. मात्र, नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाहीत, त्यामुळे जयंत पाटील यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी ईडीकडे केले होती. त्यानुसार, सोमवारी पुन्हा जयंत पाटील यांनी ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले असून २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना आयएल एँड एफएस प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांना कमिशन रक्कम दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच प्रकरणी जयंत पाटील यांचा ईडीसमोर  जबाब नोंदवला जाणार आहे. त्यामुळे येत्या २२ मे  रोजी जयंत पाटील यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version