लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडणार असून निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तामिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान रद्द केले आहे. वेल्लोर येथे 18 एप्रिल रोजी मतदान पार पडणार होते. मात्र काही दिवसांपूर्वी द्रमुकच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतले असल्याचे समजते आहे.
तामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान रद्द करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने मतदान रद्द केले आहे.
वेल्लोर मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडणार होते.
आयोगाने मतदान रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींकडे मागणी केली होती.
यावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा निवडणूक रद्द होण्याची पहिलीच वेळ असून यापूर्वी तामिळनाडूमधील राधाकृष्णनगर येथील विधानसभा रद्द केली होती.
आयकर विभागाने द्रमुक नेत्याच्या सीमेंटच्या गोदामातून 11 कोटी 53 लाख रुपये जप्त केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.