शहापुरमध्ये भूकंपाचे सुप्त केंद्र, भूकंपमापनाचे तीनही यंत्रे निकामी

शहापुरमध्ये भूकंपाचे सुप्त केंद्र, भूकंपमापनाचे तीनही यंत्रे निकामी

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसानगरमध्ये भूकंपमापन यंत्रणेत मे महिन्यात दोनदा तर जून महिन्यात एकदा भूंकपाच्या नोंदी आढळल्या आहेत. भूकंपाचे सुप्त केंद्र असल्यानं शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील भातसानगरमधील तीनही भूकंपमापन यंत्रे निकामी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

 

भातसानगर येथे भूकंपाचे सुप्त केंद्र असल्यानं हा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र घोषीत करण्यात आले होते. मात्र, 3 पैकी 2 भूकंपमापनयंत्रे 6 महिन्यापूर्वी नादुरुस्त झाले. हे भूकंपमापन यंत्रे दुरुस्तीसाठी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीकडे पाठवण्यात आले होते.

 

तर तिसरे भूकंममापन यंत्र 15 दिवसांपासून नादुरूस्त झालं. नवीन भूकंपमापनयंत्र जोवर मिळत नाही तोवर भूगर्भातील धोक्याच्या महत्त्वपूर्ण सूचना मिळण्यापासून येथील वेधशाळेला अनभिज्ञ रहावे लागत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version