सध्या देशभरात वाहनचालकांना लक्ष्य करून एक मोठा Online Scam सुरू असल्याचे समोर आले आहे. Cyber Security क्षेत्रातील कंपनी Cyble च्या तपासात आढळून आले आहे की, अगदी अधिकृत e-Challan Portalसारख्या दिसणाऱ्या तब्बल 36 बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीसाठी कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज नसून, केवळ एका SMS लिंकद्वारे लोकांना जाळ्यात ओढले जात आहे.
या स्कॅमची सुरुवात सामान्यतः भारतीय मोबाईल नंबरवरून येणाऱ्या मेसेजने होते. हा नंबर शोधल्यास तो State Bank of India (SBI) शी संबंधित असल्यासारखा दिसतो, त्यामुळे अनेकजण सहज विश्वास ठेवतात. मेसेजमध्ये तुमच्यावर वाहतूक नियमभंगाचा Traffic Challan झाल्याचे सांगितले जाते. रक्कम मुद्दाम कमी ठेवली जाते आणि 24 तासांची Deadline दिली जाते. वेळेत पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जाते.
मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याला एका बनावट वेबसाईटवर नेले जाते. ही वेबसाईट हुबेहूब सरकारी वेबसाईटसारखी तयार केलेली असते. सरकारी रंगसंगती, लोगो आणि लेआउट वापरून विश्वास निर्माण केला जातो. वाहन क्रमांक टाकताच तिथे एक खोटे चलान रेकॉर्ड दाखवला जाते आणि लगेच Payment Page उघडते.
या पेजवर केवळ Credit Card किंवा Debit Card द्वारे पेमेंटचा पर्याय दिला जातो. वापरकर्ता कार्डची माहिती भरताच पैसे तर जातातच, पण कार्डचे संपूर्ण तपशीलही थेट स्कॅमर्सकडे पोहोचतात. यानंतर खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढली जाण्याचा धोका निर्माण होतो.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. चलान तपासण्यासाठी नेहमीच अधिकृत Parivahan Website किंवा संबंधित राज्याच्या ट्रान्सपोर्ट पोर्टलचा वापर करावा.
तसेच, एखादी वेबसाईट फक्त कार्डद्वारेच पेमेंटचा आग्रह धरत असेल तर सावध व्हावे. अशा संशयास्पद मेसेज किंवा वेबसाईट्सची तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे. थोडीशी जागरूकता आणि खबरदारी घेतल्यास अशा ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.
हेही वाचा: Prashant Jagtap : ठाकरेंची ऑफर नाकारून प्रशांत जगताप यांचा 'या' पक्षात अधिकृत प्रवेश
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.