विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले ‘ते’ महत्वाचे काम

विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले ‘ते’ महत्वाचे काम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील 107 सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्र सरकारकडून आर्थिक मंजुरी मिळविलीय.

हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे दहा हजार कोटी रु. येत्या दोन वर्षांत देण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलंय. 

‘राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील आणि दुष्काळी तालुक्यांतील 107 प्रकल्पांचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला होता आणि त्यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

नीती आयोगासोबत पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांविषयी चर्चा केली आणि अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत पाऊण तास झालेल्या चर्चेत या निधीसाठी तत्त्वतः मंजुरी मिळाली’, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version