जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग एक्सप्रेस दुर्घटनेप्रकरणी रेल्वेच्या 2 कर्मचारी निलंबित करण्यात आलंय. सावंतवाडी ते झारापच्या दरम्यान दुरांतो एक्प्र्सेचं इंजिन घसरलं होतं.
या अपघाताच कारणीभूत ठरवत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
गोव्याहून लोकमान्य टर्मिनसकडे गाडी जात असताना ही घटना घडलीय. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान रेल्वे रुळावरुन घसरण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याच्या घटना होतायंत. मात्र, अद्यापही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.