आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. साखरेच्या मागणीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात साखरेचे दर क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. तर गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे.
घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला असून, साखरेच्या दरात किलोमागे सुमारे 5 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर आता 50 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर 45 ते 56 रुपये किलो होता. आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढणार असल्याने दिवाळीपर्यंत साखरेचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी वाढत्या दरांचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांसह मिठाई उत्पादक, बेकरी उद्योग आणि किरकोळ विक्रेत्यांवरही होत असून आगामी काळात साखरेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकारकडून बाजारावर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना केल्यास दरवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.