Vegetable Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! मेथी, कोथिंबीर, कोबीसह अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस, दूध, सोने-चांदी, पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावर होऊ लागला आहे.
Vegetable Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! मेथी, कोथिंबीर, कोबीसह अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. एलपीजी गॅस, दूध, सोने-चांदी यानंतर आता पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावर होऊ लागला आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील तीव्र उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा- MSRTC News : कामात हलगर्जीपणा महागात पडला! एसटी महामंडळाकडून तब्बल 11 अधिकाऱ्यांचे निलंबन; संपूर्ण विभागात खळबळ

एल निनोमुळे निर्माण झालेली तीव्र उष्णता आणि पावसाला झालेला विलंब यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या एल निनोच्या इशाऱ्यानुसार जून महिना कोरडा गेला. जून महिना संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली. ज्यामुळे बाजारपेठेतील आवकही कमी झाली आहे.

परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची यांसह शेवगा, काकडी, गिलके, दोडके, भोपळा आणि कोबी या भाज्यांचे दर शंभर रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पाऊस लांबल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली असून वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version