दाऊदला दणका, दुबईतून फारूख टकलाला अटक

दाऊदला दणका, दुबईतून फारूख टकलाला अटक

वृत्तसंस्था, मुंबई

1993 मुंबई ब्लास्टचा आरोपी असलेल्या फारूख टकला नावाच्या आरोपीला अखेर केंद्रीय अन्वेक्षण विभागाने अखेर अटक केली आहे. दुबई वरून त्या आणण्यात आले असून 25 वर्षांनतर झालेल्या अटकेला सीबीआयच मोठ यश समजल जातय.

या फारूख टकलाच्या चौकशीतून महत्वाचे धागेदोरे मिळण्याचा दावा केला जातोय. 12 मार्च 1993 साली मुंबई झालेल्या साखळी स्फोटांच्या एका महत्वाचा आरोपीला गुरुवारी सीबीआय ने अटक केली.

यासिन मन्सूर मोहम्मद फारूख उर्फ फारूख टकला विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती. त्याच आधारावर सीबीआय ने त्याला दुबई वरून अटक केली.

गुरुवारी त्याला भारतात आणले असून मुंबईच्या विशेष टाडा कोर्टासमोर हजर करण्यात आलं. 25 वर्षांनतर झालेल्या या अटकेला सीबीआयच मोठ यश समजले जातयं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version