जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या डीएसकेंनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालीय.
या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय.
काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर डीएसकेंनी क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे केलाय. याच रणनितीचा भाग म्हणून डीएसके विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करताहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.