लोकांचे पैसे परत देण्यासाठी डीएसकेंनी लोकांपुढेच पसरली झोळी

लोकांचे पैसे परत देण्यासाठी डीएसकेंनी लोकांपुढेच पसरली झोळी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएस कुलकर्णींनी आता अनोखा मार्ग वापरलाय. कुलकर्णींना आता लोकांनीच पैसे द्यावेत, असं आवाहनचं डीएसकेंनी केलंय.

आर्थिक अडचणीत असलेल्या कुलकर्णींनी आता अमेरिकेच्या धर्तीवर क्राऊड फंडिंगचा प्रयोग राबलाय. या माध्यमातून थेट सामान्य लोकांना आर्थिक मदतीची त्यांनी केलीय. ज्यांना जितकी शक्य आहे, तितकी आर्थिक मदत करावी, असं आवाहनचं डीएसकेंनी केलंय.

50 कोटी रुपये उच्च न्यायालयात भरण्यास DSK यांना शक्य न झाल्याने DSK यांच्यावर ही वेळ आलीय. शिवाय येत्या मंगळवारी होत असलेल्या सुनावणीत उच्च न्यायालय नेमकं काय आदेश देतंय, यावर DSK यांचं भवितव्य अवलंबून आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version