जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमांगी कुलकर्णी यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जात नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता.
याप्रकरणी मुळेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसंच काही गुंतवणुकदारांनी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिलीय. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. डीएसके बिल्डर यांच्या कार्यालयात काम करणार्या अनेक कर्मचार्यांचा पगार देखील डीएसके यांनी गेल्या काही महिन्यांपासून दिलेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.